पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO : ओला- सुका कचरा वेगळा करा, पुणेकर सफाई काकांचं गाणं व्हायरल

महादेव जाधव

पुणे महानगर पलिकेत सफाई कामगार म्हणून काम करणारे महादेव जाधव यांनी  स्वच्छतेविषयी जागृती करण्याचा नवा मार्ग शोधून काढला आहे. त्यांनी गाण्याद्वारे जनजागृती करण्याचं ठरवलं आहे. त्याचं  शहर अस्वच्छ करण्याऱ्यांमध्ये जगजागृती करणारं गाणं सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. 

बांगलादेशमध्येही कांद्याचे वांदे, प्रति किलो २२० रुपयांचा दर

ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करावं, परिसर स्वच्छ ठेवावा असं अनेकदा सांगण्यात येतं, मात्र स्वच्छतेविषयी जनजागृती करूनही लोक दुर्लक्ष करतात. तेव्हा महादेव यांनी स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी गाण्याचा मार्ग शोधून काढला आहे. गाण्याद्वारे ते स्वच्छता, ओला- सुका कचरा वेगळं करणं, प्लास्टिकचा वापर टाळणे यांसारख्या अनेक मुद्द्यावर जानजागृती करत आहे. गाण्याद्वारे स्वच्छतेचा संदेश लोकापर्यंत जास्त प्रभावीपणे पोहोचेल असं महादेव यांना वाटतं त्यामुळे त्यांनी हा नवा प्रयोग करुन पाहिला आहे. 

'मला गाणी गाण्यास कोणीही सांगितलं नाही, मात्र असं केल्यानं लोकांपर्यंत माझा स्वच्छता संदेश खूप चांगल्या प्रकारे पोहोचतो. गेल्या २५ वर्षांपासून मी काम करत आहे. आता बदल होत आहेत. किमान ६० टक्के लोक नियम पाळत आहेत., असं महादेव जाधव एएनआयशी साधलेल्या संवादात म्हणाले. दररोज सफाई करताना महादेव जाधव स्वच्छतेविषयी जागृती करणारी गाणी गातात. 

उद्धव ठाकरे यांचा प्रस्तावित अयोध्या दौरा तूर्त लांबणीवर

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:sanitation worker OF PMC has found out a novel method to create awareness amongst people about waste disposal