पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुराच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक दाखल

कोल्हापूर महापूर

जुलै अखेर आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीसह पूरामुळे झालेल्या जीवित व आर्थिक नुकसानीची माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर राज्याचे मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी गुरुवारी सादरीकरण करून नुकसानीची माहिती दिली.

पाकिस्तानकडून अण्वस्त्र सज्ज गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या धोरण व नियोजनचे सहसचिव डॉ. थिरुपुगाज यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पथक पाहणी दौऱ्यावर आले आहे. बुधवारी संध्याकाळी त्यांचे पुण्यात आगमन झाले. गुरुवारी सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची त्यांनी आढावा बैठक घेतली. या पथकात चित्तरंजन दास, आर.पी. सिंग, व्ही.पी. राजवेदी, मिलींद पनपाटील, संजय जैस्वाल, ओमकिशोर या केंद्रीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ते पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांची दोन दिवस पाहणी करून ३१ ऑगस्ट रोजी कोकणात जाणार आहेत.

राहुल गांधींना तिरंग्यापेक्षा पाकिस्तानचीच जास्त काळजी - स्मृती इराणी

समितीसमोर झालेल्या नुकसानीची माहिती सादर करताना सचिव किशोरराजे निंबाळकर म्हणाले, या आपत्तीत प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन बचाव व मदत कार्य युध्द पातळीवर केले. यावर्षी मान्सूनचे राज्यात उशीरा आगमन झाले. त्यानंतर ३ ते १० ऑगस्ट या कालावधीत कोकण आणि पुणे विभागात अतिवृष्टी झाली. या दोन्ही विभागातील भीमा आणि कृष्णा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पुरामुळे बाधित झालेल्या राज्यातील ७ लाखांहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. या बाधित लोकांची एक हजारहून अधिक शिबिरात व्यवस्था करण्यात आली. या बाधित लोकांना शासनाच्यावतीने १० किलो तांदूळ आणि गहू तसेच रॉकेलचे वाटप करण्यात आले. तसेच बाधित झालेल्या ग्रामीण कुटुंबाला प्रत्येकी १० हजार तर शहरी भागातील कुटुंबांना १५ हजार रुपयाचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. या अतिवृष्टीमुळे जीवितहानी बरोबरच वित्तीयहानीही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. शेतीचे देखील नुकसान झाले आहे. या आपत्तीमध्ये बाधित अत्यावश्यक सेवा सुरळीत करण्यासाठी राज्य शासनाने प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे विभागातील नुकसानीची माहिती देताना डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, विभागातील ५८ तालुक्यांपैकी ३८ तालुक्यांना पूराचा आणि अतिवृष्टीचा फटका बसला. यामध्ये ७२७ गावे बाधित झाली असून एक लाख ८० हजार ४४८ कुटुंबातील सात लाख ५९ हजार ५९५ लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. या आपत्तीत विभागातील ६० लोकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील १०, सातारा जिल्ह्यातील ६, सांगली जिल्ह्यातील २८, सोलापूर जिल्ह्यातील ३ तर कोल्हापूर जिल्ह्यातील १३ लोकांचा समावेश आहे. या आपत्तीत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे आलेल्या पूराचे पाणी नद्यांच्या धोकापातळीपेक्षा ७ ते ८ फुटांनी अधिक होते. कोल्हापूर जिल्ह्याचा रस्ते संपर्क पूर्णत: तुटला होता. सांगली व कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागालाही याचा मोठा फटका बसला. या दोन्ही जिल्ह्यात बागायती क्षेत्र अधिक असून या पूरामुळे या पीकांचे पुर्णत: नुकसान झाले आहे. तसेच इचलकरंजी या शहरात असणाऱ्या हॅण्डलूम आणि पॉवरलूम या उद्योगाला याचा फटका बसला असून या ठिकाणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर घरांची पडझड झाली. शेतीसह शेतकऱ्यांच्या पशूधनाचे ही मोठे नुकसान झाले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:sangli kolhapur mahapur central government panel reached in maharashtra to review situation