पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, संभाजी पूल दुचाकींसाठी खुला

संभाजी पूल

पुण्यातील अलका टॉकीज जवळील संभाजी पूल (लकडी पूल) दुचाकी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या संदर्भातील आदेश पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने काढले असून, त्या संदर्भात नागरिकांच्या काही सूचना असतील तर त्या मागविल्या आहेत. या आदेशामुळे आता दुचाकीस्वार संभाजी पुलावरून टिळक चौकाकडे किंवा टिळक चौकातून खंडोजीबाबा चौकाकडे जाऊ शकतात. पुण्याचे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली.

पुण्यातील हे रस्ते गुरुवारी वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

सात एप्रिल १९९४ पासून संभाजी पुलावर दुचाकीस्वारांसाठी प्रवेश बंदी घालण्यात आली होती. या पुलावरून केवळ तीन आणि चारचाकी वाहनांना प्रवेश दिला जात होता. त्यामुळे दुचाकीस्वारांना गाडगीळ पूल (झेड ब्रीज), बाबा भिडे पूल किंवा पुना हॉस्पिटलजवळील पुलावरून जावे लागत होते. पण आता दुचाकीस्वार संभाजी पुलावरूनही प्रवास करू शकणार आहेत. 

२०१५ मध्ये पुणे महापालिकेच्या शहर सुधारणा समितीत संभाजी पूल दुचाकीस्वारांसाठी कायमस्वरुपी खुला करावा, असा ठराव मंजूर करण्यात आला होता. अनेक पुणेकरही हा पूल कायमस्वरुपी दुचाकींसाठी खुला करावा अशी मागणी करीत होते. त्यामुळे त्यांना आता या पुलाचा उपयोग करता येणार आहे.

..असं बोलण्यापेक्षा मेलेलं बरं: उदयनराजे भोसले