पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गायीची सेवा केल्यास गुन्हेगाराचा अपराधी भाव कमी होतोः मोहन भागवत

मोहन भागवत

कारागृहात कैदेत असलेल्या कैद्यांना गायींची सेवा करण्याचे काम दिले जाते तेव्हा त्यांच्यातील अपराधी प्रवृत्ती कमी होते, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे. गायीची वैशिष्ट्ये जगाला दाखवण्यासाठी अशाप्रकारच्या निष्कर्षांना अधोरेखित करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. ते पुणे येथे आयोजित 'गौ विज्ञान' कार्यक्रमात बोलत होते. 

ते म्हणाले, गाय ब्रह्मांडाची माता आहे. ती माती, पशु, पक्षी आणि मनुष्याचेही पोषण करते आणि त्यांना रोगापासून वाचवते. त्याचबरोबर मानवी हृदयाला फुलाप्रमाणे कोमलही बनवते. 

आठवलेंनी या घोषणेबद्दल CM उद्धव ठाकरेंचे मानले आभार

जेव्हा कारागृहात गोशाळा बनवली गेली आणि कैद्यांनी गायीची सेवा करण्यास सुरुवात केली. तेव्हा अधिकाऱ्यांनी त्या कैद्यांची अपराधिक प्रवृत्ती कमी होत असल्याचे निरीक्षण नोंदवले. काही कारागृह अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या अनुभवाच्या आधारावर हे मी तुम्हाला सांगत आहे.

सशस्त्र सेना ध्वज दिनी PM मोदींच्या हस्ते निधीसंकलनाचा शुभारंभ

जर गाईंची उपयोगिता जगासमोर आणायची असेल तर आपल्याला दस्तावेज करावे लागतील. आपल्याला कैद्यांवर मनोवैज्ञानिक प्रयोग करावे लागतील आणि त्यांच्याकडून काही काळ गोसेवा केल्यानंतर झालेल्या बदलांची समिक्षा करावी लागेल. विविध ठिकाणांहून त्याचे परिणाम एकत्रित करावे लागतील.

महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती

ज्या संघटना मोकळ्या फिरणाऱ्या गायींना आश्रय देतात. त्यांच्याकडे जागेची कमतरता असते. समाजातील प्रत्येक व्यक्तीने जर एक गाय पाळण्याचा निर्णय घेतला तर ही समस्या सुटेल आणि गाय कत्तलखान्यात जाण्यापासून वाचतील. पण आज हिंदूच गायींना कत्तलखान्यात पाठवत आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:RSS Chief Mohan Bhagwat says rearing cows found to have lessened jail inmates criminality