पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खिशात ३ रुपये असतानाही पुणे बस स्थानकावर सापडलेले ४० हजार केले परत

प्रातिनिधिक छायाचित्र

खिशात दमडीही नसताना हाती आलेल्या पैशांचा मोह झाला नाही असा क्वचितच एखादा व्यक्ती सापडेल. मात्र कठीण परिस्थितीतही  कोणत्याही गोष्टीचा मोह  न बाळगणारी व्यक्ती ही खरी कौतुकास पात्र असते. खिशात केवळ ३ रुपये असताना साताऱ्यातील प्रामाणिक धानजी जगदाळे यांनी  पुणे बसस्थानकावर सापडलेली ४० हजारांची रोकड त्याच्या मूळ मालकाला परत केली. 

सत्तेचा तिढा सोडविण्यासाठी शिवसेना नेत्याचे मोहन भागवतांना पत्र

धानजी यांच्या प्रामाणिकपणाचं समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. साताऱ्यातील माण तालुक्यातील पिंगळी गावचे रहिवाशी  असलेले धानजी छोटी मोठी कामं करून आपलं पोट भरतात. काही कामानिमित्तानं ते पुण्यात आले होते. बसस्टॉपवर त्यांना एका बॅगेत नोटांचे बंडल दिसले. आजूबाजूला चौकशी करत असताना त्यांना एक व्यक्ती तणावात असल्याचं आढळलं. धानजी यांनी त्याची विचारपुस केली असता, त्यानं पैशांबद्दल सांगितले. पत्नीच्या ऑपरेशनसाठी त्या व्यक्तीनं पैसे जमवले होते. धानजींना हे पैसे त्याचे असल्याची खात्री पटल्यावर त्यांनी ते परत केले. 

गावाकडच्या आठवणी सांगत अजिंक्य म्हणाला, शेतकरीच रिअल हिरो

धानजी यांच्या प्रामाणिकपणासाठी १ हजार रुपये बक्षिस म्हणूनही संबधीत व्यक्तीनं त्यांना देऊ केले. मात्र धानजींनी पैसे स्वीकारण्यास नकार दिला. धानजी यांनी केवळ ७ रुपये स्वीकारले.

'माझ्याकडे घरी परतण्यासाठी तिकिटीचे पुरेसे पैसे नव्हते. माझ्या खिशात केवळ ३ रुपये शिल्लक होते. घरी परतण्यासाठीचे तिकिट हे १० रुपयांचं होतं म्हणून मी केवळ ७ रुपये  स्वीकारले', असं  धानजींनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. 

...म्हणून आपल्या खेळाडूंना मॅक्सवेलसारखा निर्णय घेणं अशक्य: युवी

धानजी यांचा प्रामाणिकपणा पाहून भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि  माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आर्थिक मदत देऊ केली. मात्र ती घेण्यास धानजी यांनी नकार दिला. धानजी यांच्या मदतीसाठी अनेकजण पुढे आले  मात्र कोणत्याही स्वरुपाची मदत घेण्यास  त्यांनी साफ नकार दिला आहे, लोकांनी नेहमी प्रामाणिकता जपली पाहिजे असं ते म्हणाले.