पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिरुरमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट; मारहाणीत वृध्द दाम्पत्य गंभीर जखमी

शिर्डी तिहेरी हत्या

पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा धुमाकुळ वाढत चालला आहे. घरफोडी करुन गावकऱ्यांवर प्राणघातक हल्ला करत चोऱ्या केल्या जात आहे. सोमवारी पहाटे अशीच एक घटना शिरुर तालुक्यामध्ये घडली आहे. केंदुर आणि रावडेवाडी या गावामध्ये चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. चोरट्यांनी केंदुर येथे वयोवृध्द दाम्पत्यांना मारहाण करत चोरी केली आहे. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. 

शेअर बाजारात 'अच्छे दिन', सेन्सेक्समध्ये ८०० अंकांची उसळी

शिरूर तालुक्यातील केंदूर येथे भाजपचे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब साकोरे यांच्या घरावर सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास दरोडा टाकण्यात आला. यावेळी चोरट्यांनी साकोरे यांचे वडील कोंडीभाऊ साकोरे आणि आई लक्ष्मीबाई सोकोरे या दाम्पत्यांना बेदम मारहाण करत चोरी केली. या मारहाणीमध्ये दोघे ही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दुसरी घटना ही रावडेवाडी गावात घडली आहे. याठिकाणी चोरट्यांनी दुकानातील माल लंपास केला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढ चाललेल्या दोरड्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

मोदी-ट्रम्प भेटीची इम्रान खान यांना धास्ती