पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खूशखबर! सिंहगडावर जाणार रस्ता तयार, पण...

सिंहगडावर जाणारा रस्ता (छायाचित्र - मिलिंद सौरकर)

पावसाळा सुरू झाला की पुणेकरांना वेध लागतात सिंहगडावर जाण्याचे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सिंहगडावरील निसर्गसौंदर्य आणखी खुलते. ढगांच्या सान्निध्यात काहीवेळ घालवण्याचे सुख पर्यटकांना मिळते. पण गेल्यावेळी सिंहगडावर जाणारा रस्ता दुरुस्तीसाठी बंद करण्यात आल्यामुळे अनेकांना आपल्या प्लॅनवर फुली मारावी लागली होती. आता सर्व पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. सिंहगडावर जाणारा घाट रस्ता येत्या १५ दिवसांत पूर्ण होईल, असे राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हटले आहे. पण नवा रस्ता आधीपेक्षा अरुंद असल्यामुळे गर्दीच्यावेळी घाटात ट्रॅफिक जाम होण्याची चिन्हे आहेत.

बंगालमध्ये काय सुरु आहे, मोहन भागवतांचा संतप्त सवाल

गेल्यावर्षी दरड कोसळल्यामुळे आणि रस्ता खूपच खराब झाल्यामुळे तो रहदारीसाठी बंद करण्यात आला होता. शेवटच्या टप्प्यातील दोन किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला होता. त्यानंतर या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. यावर्षी फेब्रुवारीमध्ये घाटावर सिमेंटचा रस्ता तयार करण्याचे काम बऱ्यापैकी पूर्ण करण्यात आले. सिमेंटच्या रस्त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला पेव्हर ब्लॉक बसवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हा रस्ता आधीपेक्षा अरूंद झाला आहे. आधीचा रस्ता साडेपाच मीटर रुंद होता. पण आता तो त्यापेक्षा कमी झाला आहे.

'शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या तर त्याचं पाप फडणवीस सरकारचं'

सिंहगडावर वारंवार जाणारा ट्रेकर राहुल मराठे म्हणाले, आधीचा रस्ता कमी रुंद होता म्हणून सिंहगडावरील घाट रस्त्याचे काम करण्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याने ठरविले. पण आताचा रस्ता आधीपेक्षा अरुंद करण्यात आला आहे. चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सिंहगडावर गर्दीच्यावेळी वाहतुकीची कोंडी झाल्याचे पाहायला मिळते.