पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... आणि पोलिसांना मागितली पूरग्रस्तांची माफी

निदर्शन करणारे पूरग्रस्त

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यावेळी पूरग्रस्त भागातील नागरिकांशी पोलिसांनी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप निदर्शने करणाऱ्या नागरिकांनी केला. विशेषतः महिलांना अकारण धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप निदर्शकांनी केला. या संपूर्ण प्रकारावरून निदर्शक संतप्त झाल्यामुळे अखेर पोलिसांनी एक पाऊल मागे घेत जर काही अनुचित प्रकार घडला असेल, तर आम्ही माफी मागतो, असे सांगत दिलगिरी व्यक्त केली.

... पण मी इंद्राणी मुखर्जींना कधी भेटलोच नाही - चिदंबरम

पुण्याच्या दक्षिण भागामध्ये बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर आंबिल ओढ्याला आलेल्या पुराचे पाणी सहकार नगर, पद्मावती, टांगेवाली कॉलनी या भागात मोठ्या प्रमाणात घुसले. या पाण्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पण या भागात महापालिकेकडून आणि राज्य सरकारकडून अपेक्षित मदत न मिळाल्याने त्याचबरोबर येथील अनेक प्रश्नांचा वारंवार पाठपुरावा करूनही त्यावर तोडगा न काढल्यामुळे काही नागरिक संतप्त झाले होते. त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या पाहणी दौऱ्याला विरोध केला. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

केंद्र सरकारचा पुन्हा दणका, इन्कम टॅक्समधील १५ अधिकारी निलंबित

चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यावेळी निदर्शकांना रोखून धरताना काही नागरिकांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. यामुळे पूरग्रस्त आणखी संतापले. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांकडे याचा जाब विचारण्यास सुरुवात केली. पोलिसांनी परिस्थितीचा विचार करून संतप्त पूरग्रस्तांना शांत करण्यासाठी माफी मागितली. सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.