पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धरणे कोरडी पडण्याच्या दिशेने, पुणेकरांवर चिंतेचे ढग

खडकवासला धरणांतील पाणीसाठा खूप कमी झाला आहे. (फोटो - मिलिंद साऊरकर)

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांतील पाणीसाठा अत्यंत कमी आहे. अद्याप पुण्यात पावसाने जोर धरलेला नाही. त्यामुळे पुणेकरांवर चिंतेचे सावट असल्याचे दिसू लागले आहे. 

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांमध्ये मिळून मंगळवारी संध्याकाळी २.७२ टीएमसी एवढा पाणीसाठा होता. गेल्यावर्षी याच काळात हा साठा ३.०७ टीएमसी एवढा होता. गेल्यावर्षी याच काळात पुण्यात मान्सूनचे आगमन झाले होते आणि पावसाला सुरुवात झाली होती. पण यंदाची स्थिती वेगळी आहे. पावसाला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्याचवेळी धरणांत खूप कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जर पुण्यात दमदार पावसाला सुरुवात झाली नाही, तर पुणेकरांवर पाणी टंचाईचे भीषण संकट ओढावू शकते.

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच, वर्धापनदिनी पक्षाचा निर्धार

पुणे विभागाचा विचार केल्यास सध्या ६.३५ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी याचवेळी ही टक्केवारी १७.४२ इतकी होती. येत्या सोमवारी-मंगळवारी पालख्यांचे अनुक्रमे देहू आणि आळंदीतून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होते आहे. पालख्यांसाठी ०.५८ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर धरणांतील पाणीसाठा आणखी कमी होणार आहे. 

जलसंपदा खात्याचे पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे म्हणाले, गेल्यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे धरणात मुळातच कमी पाणीसाठा शिल्लक होता. येत्या शुक्रवारपर्यंत राज्यात मान्सूनचे आगमन होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे फारशी चिंता करण्याचे कारण नाही. धरणांत सध्या शिल्लक असलेले पाणी १५ जुलैपर्यंत पुरेल, याचा आम्हाला विश्वास आहे. 

राम मंदिराला सरकारकडूनच उशीर - सुब्रमण्यम स्वामी

धरणांतील पाणीसाठा
खडकवासला - ०.४१ टीएमसी २०.९७ टक्के
पानशेत - १.५३ टीएमसी १४.४० टक्के
टेमघर - ०.७८ टीएमसी ६ टक्के
वरसगाव - ०