पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संभाजी भिडेंना पालखी सोहळ्यासमोर चालण्यास नकार

संभाजी भिडे गुरुजी

संभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर चालण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. याबाबत पालखी सोहळा समितीच्या वतीने पुणे पोलिसांना पत्र देण्यात आले होते. त्यानुसार पुणे पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. पालखीच्या मागे असलेल्या दिंडीनंतर संभाजी भिडे चालू शकतील. गतवर्षीही हा विरोध करण्यात आला होता. दरम्यान, शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते दिंडीनंतर चालतील, असे शिवप्रतिष्ठानच्या वतीने स्पष्ट करण्यात आल्याचे एबीपी माझाने म्हटले आहे.

पुणेः शेतजमिनीवर धुडगूस; कर्नलसह ४० जवानांवर गुन्हा दाखल

परंपरागत पद्धतीने चालत आलेला दिंड्यांचा क्रम कायम राहवा असे मत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुखांनी मांडले. बुधवारी संभाजी भिडे गुरुजी आणि त्यांचे समर्थक पुण्यातील जंगली महाराज मंदिरात जमतील आणि सर्व पालख्या पुढे गेल्यानंतर सोहळ्यात सहभागी होऊन शिवाजी नगर चौक ते डेक्कनच्या संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत चालत जातील.

महापालिकेच्या नाट्यगृहांत पार्किंगसाठी पैसे, पदाधिकाऱ्यांकडून समर्थन

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि तुकाराम महाराजांची पालखी यांच्या पालखी मार्गात वाद झाला होता. त्यावेळी शिवप्रतिष्ठानचे काही कार्यकर्ते दिंडीच्या पुढे येऊन मार्गक्रमण करू लागले. यावर दिंडीतील प्रमुखांनी आक्षेप घेतला होता.

पुण्यात प्लास्टिक बंदी फसली, वापरात फक्त २० टक्के घट

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Refuse to walk ahead of dnyaneshwar maharaj palkhi to sambhaji bhide and shiv prathishtan pune