पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुण्यात १३ प्रमुख ठिकाणी मोठे बदल

पुणे शहर वाहतूक

पुण्यातील काही रस्त्यांवर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहरातील १३ प्रमुख ठिकाणांमध्ये आवश्यक बदल करण्यात येणार आहेत. पुणे शहर वाहतूक पोलिस आणि पुणे महापालिका संयुक्तपणे हे काम करणार आहेत. या १३ ठिकाणांमध्ये पुण्याच्या सर्व भागांतील प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे.

पुण्याचे वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज देशमुख म्हणाले, शहरातील प्रमुख रस्त्यांवरील १३ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, ती आवश्यक बदल करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर काही पायाभूत बदलही करावे लागणार आहेत. हे बदल केल्यानंतर केवळ वाहतूक सुरळीत होणार नसून, संबंधित ठिकाणी होणारे अपघातही ५० टक्क्यांनी कमी होतील. वाहनचालकांच्या संख्येत झालेली वाढ लक्षात घेऊन हे बदल केले जातील. अनेक ठिकाणे अशी आहेत की तिथे सर्व्हिस रस्ता, वळणासाठी लागणारी सुविधा यासारख्या सुविधाही नाहीत. मुळातच रचना चुकीची असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो आणि अपघातही घडतात.

वाहतुकीचे नियम पाळा, १०० रुपयांचे व्हाऊचर मिळवा!

आम्ही वाहतूक शाखेच्या पोलिसांसोबत सध्या काम करीत आहोत. त्यामध्ये पुनर्रचनेचा आराखडा तयार करण्यात येत आहे, असे महापालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.

जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन रस्ता ज्या पद्धतीने विकसित करण्यात आला ते प्रारुप शहरात इतरत्रही लागू केले गेला पाहिजे. शहराच्या संपूर्ण विकासावरच लक्ष दिले गेले पाहिजे. त्यामुळे वाहतूक सुरळीत व्हायला मदत होईल, असेही पंकज देशमुख यांनी सांगितले. 

काय सांगता!, पुण्यात वाहन नोंदणीत चक्क घट

शहरातील २४ प्रमुख रस्त्यांचा पुनर्विकास करण्यावरही पुणे पोलिस आणि महापालिका काम करीत आहे. यामध्ये कर्वे रस्ता, तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता), सेनापती बापट रस्ता, अहमदनगर रस्ता यांचा समावेश आहे.

पुनर्विकास करण्यात येणारी १३ ठिकाणे
१. आंबेडकर चौक, वारजे
२. संतोष हॉल, सिंहगड रस्ता
३. एमएनजीएल चौक, पौड रस्ता
४. सिरम इन्स्टिट्यूट भाग, हडपसर
५. मगरपट्टा चौक, हडपसर
६. विद्यापीठ चौक
७. मुंढवा चौक
८. ताडी गुत्ता चौक, मुंढवा
९. आप्पा बळवंत चौक
१०. रामवाडी चौक, नगर रस्ता
११. बाणेर चौक
१२. खडी मशीन चौक, उंड्री
१३. घोरपडी चौक, घोरपडी