अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी स्वागत केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आपल्याला अतिशय आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. आज बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते. त्यांना अतिशय आनंद झाला असता, असे त्यांनी म्हटले.
दशकांपासून सुरु असलेल्या प्रकरणाचा गोड शेवटः मोहन भागवत
पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी राज ठाकरे हे सध्या पुणे येथे आले आहेत. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ज्या कारसेवकांनी राम मंदिरासाठी बलिदान दिले. त्यांचे बलिदान सार्थकी लागले, असे म्हणता येईल. या निकालासाठी सर्वोच्च न्यायालयाचे आभार आणि अभिनंदन. हा निकाल ऐकण्यासाठी बाळासाहेब आज असायला हवे होते. त्यांनी खूप आनंद झाला असता.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालातील पाच महत्त्वाची निरीक्षणे
MNS chief Raj Thackeray: I am happy today. All 'karsevaks' who gave sacrifices during the entire struggle..their sacrifice has not gone waste.Ram Temple must be constructed at the earliest. Along with Ram Temple, there should also be ‘Ram Rajya’ in the nation,that is my wish. pic.twitter.com/kUtg2cHTFN
— ANI (@ANI) November 9, 2019
दरम्यान, अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वागत केले आहे. न्यायालयाकडून न्याय मिळाल्याची भावना सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली. हे प्रकरण गेल्या अनेक दशकांपासून सुरु होते. त्याचा शेवट गोड झाला. याकडे कोणाचा विजय किंवा पराभव म्हणून पाहू नये. समाजात शांतता आणि सोहार्द टिकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही स्वागत करतो, असेही भागवत यांनी म्हटले.