पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज ठाकरेंची ईडीची चौकशी निरर्थक: दिवाकर रावते

परिवहन मंत्री दिवाकर रावते

लोकशाहीत कोणत्याही व्यक्तीला नाहक त्रास होत असेल, तर त्याच्या पाठिशी उभे राहण्यात काय चुकीचे आहे, असे सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीची चौकशी निरर्थक असल्याची भूमिका परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मांडली. राज ठाकरे यांच्या ईडीच्या चौकशीवर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना समर्थन केले, त्या प्रश्नावर रावते यांनी आपले मत मांडले.

'ईडीच्या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही'

एसटी महामंडळाच्या महिला चालक आणि वाहक भरतीबाबत विचारले असता ते म्हणाले की, एसटी महामंडळाने १६३ महिलांची निवड केली असून १४२ महिलांना वर्षभर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आता येत्या १० ते १२ वर्षांत एसटीत सुमारे १० हजार महिला चालक असतील. नवीन ४०० शिवशाही बस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. २०० ई-बसची निविदा काढली आहे. या महिन्यात बस येतील.

राज ठाकरेंना अडचणीत आणणारे कोहिनूर प्रकरण नेमकं काय आहे?