पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात पुन्हा पाणी पाणी रे... पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी

पावसामुळे पुण्यात पुन्हा पाणीच पाणी

पुणे शहर परिसरात ढगांच्या गडगडाटासह आज पुन्हा पावसाला सुरुवात झाली. काही दिवसांपूर्वीच पुण्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले होते. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार शहर परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे कर्वे रोड, जंगली महाराज रस्ता, म्हात्रे पूल, नळ स्टॉप  परिसरातील सखल भागात पाणी साचले. अनेक ठिकाणी वाहने अडकल्याच्या घटना देखील घटना समोर आल्या आहेत.

NCP च्या माजी खासदाराने घड्याळ काढून बांधले शिवबंधन!

दुपारी चारच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळ पावसाने अक्षरश: थैमान घातल्याचे पाहायला मिळाले. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला. शाळेतून घरी जाणारे विद्यार्थी आणि कार्यालयातून घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पुन्हा एकदा पाण्यातून रस्ता काढत जाण्याची कसरत करावी लागली. पुणे शहर आणि परिसरामध्ये पुढील पाच दिवस ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे.  

VIDEO: वायुदलाकडून बालाकोट एअर स्ट्राईकचा प्रतीकात्मक व्हिडीओ जारी

पावसाला सुरुवात झाल्यानंतर शहरातील कमाल तापमान  २४ अंश सेल्सिअसच्या इतके झाले आहे. पावसाच्या विश्रांतीनंतर तापमान ३० अंश सेल्सिअसच्या जवळपास पोहचले होते. दरम्यान ४ ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. ५ ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज असून ६ ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.