पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

EXCLUSIVE : डेक्कन क्वीनमधील डायनिंग कार बंद होणार

डेक्कन क्वीनमधील डायनिंग कार

पुणे-मुंबई प्रवासासाठी हजारो प्रवाशांची ज्या रेल्वेगाडीला सर्वाधिक मागणी असते, त्या डेक्कन क्वीनमधील डायनिंग कार लवकरच बंद होणार आहे. पुण्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता एक पूर्ण डबा डायनिंग कारसाठी राखीव ठेवणे, यापुढे शक्य होणार नाही. त्यामुळेच हा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डेक्कन क्वीनमधील डायनिंग कार ही या गाडीची खास ओळख आहे. अनेक प्रवासी रोज पुणे-मुंबई-पुणे असा प्रवास करतात. त्यांच्यासाठी या गाडीतील विविध खाद्यपदार्थ विशेष आवडीचे आहेत. त्यामध्ये मसाला ऑम्लेट, कटलेट, चीज टोस्ट, बेक्ड् बीन्स यांचा समावेश होतो. डायनिंग कारमध्ये बसून हे पदार्थ खात जायला अनेकांना आवडते. पण लवकरच ही सुविधा बंद होणार आहे.

मुंबईत पश्चिम रेल्वेच्या रिकाम्या जागांवर भाजीपाला लावण्यास बंदी

मिलिंद देऊस्कर म्हणाले, सध्या डेक्कन क्वीनमध्ये एक संपूर्ण डबा डायनिंग कारसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्याचवेळी पुणे मुंबई दरम्यान धावणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी दिसते. त्यामुळे एक डबा डायनिंग कार म्हणून राखून ठेवणे यापुढे शक्य होणार नाही. याच पार्श्वभूमीवर डायनिंग कार बंद करण्याचा प्रस्ताव आमच्यापुढे ठेवण्यात आला आहे. तो लवकरच स्वीकारला जाईल. दरम्यान हा निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजूंचा विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

१ जून १९३० रोजी पुणे मुंबई दरम्यान डेक्कन क्वीन गाडी सुरू झाल्यावर या गाडीला डायनिंग कार जोडण्यात आला. तेव्हापासून ही देशातील एकमेव गाडी आहे. ज्यामध्ये इतक्या कमी अंतराच्या प्रवासासाठी डायनिंग कारची सुविधा देण्यात आली आहे. डायनिंग कारमध्ये एकावेळी ३२ प्रवासी बसू शकतात आणि चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात. डायनिंग कारमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये गरजेप्रमाणे बदलही करण्यात आले आहेत. 

मुंबईत रेल्वे पोलिसांना मिळणार नवे दुचाकी वाहन!

डेक्कन क्वीनमधून रोज प्रवास करणारे आणि डायनिंग कारचा वापर करणारे रोहित राठोड म्हणाले, डेक्कन क्वीनमध्ये डायनिंग कार हेच प्रवाशांचे आकर्षण आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डायनिंग कारमध्ये बसून लोणावळा, खंडाळ्याजवळ निसर्गाला न्याहाळत गरम गरम पदार्थ खात मुंबईला जाण्याची मजा वेगळीच आहे. 
डेक्कन क्वीनमधून रोज सुमारे १००० प्रवासी पुणे-मुंबई असा प्रवास करतात.