पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधींनी रोज १५ तास पक्ष कार्यालयात काम करावे, संजय राऊतांचा सल्ला

संजय राऊत (ANI)

काँग्रेस नेते राहुल गांधी हे अत्यंत चांगल्या मनाचे नेते आहेत. पण त्यांनी रोज १५ तास पक्ष कार्यालयात बसून काम केले पाहिजे, असा सल्ला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी बुधवारी एका कार्यक्रमात दिला. 'लोकमत' वृत्तपत्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात संजय राऊत यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी विविध राजकीय नेत्यांबद्दल एक चांगला गूण सांगायचा झाल्यास आणि एक सल्ला द्यायचा झाल्यास काय द्याल, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यामध्ये राहुल गांधींबद्दल उत्तर देताना संजय राऊत यांनी वरील मत मांडले. इतरही काही नेत्यांबद्दल त्यांनी आपली मते मांडली.

कलम ३७० रद्द करणे ऐतिहासिक पाऊल - लष्करप्रमुख

संजय राऊत म्हणाले, राहुल गांधी हे अत्यंत चांगल्या मनाचे नेते आहेत. पण त्यांनी रोज १५ तास पक्ष कार्यालयात बसून काम केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत कष्टाळू आहेत. ते खूप मेहनत करतात. त्यांना मला कोणताच सल्ला द्यायचा नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.

राज ठाकरेंबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे कलावंत आहेत. ते उत्तम व्यंगचित्रकार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आधी व्यंगचित्रकार होते आणि नंतर ते नेते झाले. राज ठाकरे व्यंगचित्रकार आणि नेते दोन्ही आहेत.

अजित पवारांबद्दल बोलताना ते म्हणाले, अजित पवार हे काम करणारे नेते आहेत. त्याना विषयाची माहिती असते आणि ताकदीने ते काम करतात. आमच्या सरकारमध्ये ते मंत्री आहेत. कधी कधी त्यांच्या बोलण्यावरून त्यांच्यावर टीका होते. पण त्यांनी आपल्या शैलीतच बोलत राहावे, अशी इच्छा संजय राऊत यांनी व्यक्त केली.

मुंबई - नवी मुंबईला जोडणारा पूल मुदतीपूर्वी पूर्ण करू - मुख्यमंत्री

अमित शहा धाडसीपणाने निर्णय घेतात. कलम ३७० रद्द करण्याचा त्यांचा निर्णय धाडसी होता, असेही संजय राऊत म्हणाले.