पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कात्रज प्राणिसंग्रहालयात नवा 'शेर'

कात्रजच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात नवा सदस्य आला आहे.

पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात नव्या सदस्याची भर पडली आहे. मागच्या आठवड्यात साडे चार वर्षांचा सिंह प्राणिसंग्रहालयात आणल्याची माहिती उपउद्यान अधीक्षक राजकुमार जाधव यांनी दिली आहे. अनेक पर्यटक शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी या प्राणिसंग्रहालयाला भेट देतात. या पर्यटकांना लवकरच नव्या सिंहाचे दर्शन घडणार आहे. 

सरकार हादरेल असं आंदोलन केलं: चंद्रकांत पाटील

राजकुमार जाधव म्हणाले की, राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात नव्या सदस्याचे आगमन झाले आहे. साड चार वर्षांच्या सिंहाला इंदोरहून आणण्यात आले असून त्याला सध्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले असून लवकरच पर्यटकांना या नव्या सदस्याला पाहता येईल. नवीन सिंहाचे नाव पवन असे असून लवकरच पर्यटकांसाठी त्याला संग्रहालयात ठेवण्यात येईल, अशी माहिती जाधव यांनी दिली.   

भाजपतून निलंबित आमदाराचे विधानसभा सदस्यत्वही रद्द

यापूर्वी २०१६ मध्ये गुजरातच्या सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून तेजस आणि सिब्बू नावाच्या सिंहांना या प्राणिसंग्रहालयात आणण्यात आले होते. आशियाई सिंहाची तेजस आणि सिब्बू  ही महाराष्ट्रातली एकमेव जोडी होती. या दोघांना पाहण्यासाठी पर्यटक याठिकाणी मोठी गर्दी करत असत. यातील तेजस या ९ वर्षांच्या सिंहाचा मागील वर्षी पक्षाघातामुळे मृत्यू झाला होता.