पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यातील बाणेरमधील नवे पासपोर्ट कार्यालय जुलैअखेर कार्यरत

प्रातिनिधिक छायाचित्र

पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील पासपोर्ट कार्यालय येत्या जुलैअखेर बाणेरमधील नव्या ठिकाणी सुरू होईल. पुण्याचे विभागीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले यांनी ही माहिती दिली. सेनापती बापट रस्त्यावरील पासपोर्ट कार्यालयातील वस्तू व सामग्री बाणेरच्या कार्यालयात स्थलांतरित करण्यास सुरुवात झाली आहे. पण हे काम पूर्ण होण्यास दीड महिन्याचा वेळ लागेल.

पासपोर्ट कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पासपोर्ट कार्यालयाची सेवा सुरू करण्यासाठी मुख्य सर्व्हरशी कॉम्प्युटर जोडणे (नेटवर्किंग) आवश्यक आहे. त्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाची परवानगी आवश्यक आहे. या परवानगीसाठी पत्र पाठविण्यात आले आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर टाटा कन्स्लटन्सीकडून पासपोर्ट कार्यालयात कॉम्प्युटर जोडणी सुरू केली जाईल. सध्या विभागीय पासपोर्ट कार्यालय सेनापती बापट रस्त्यावरून कार्यरत आहे.

बाणेरमधील नवीन इमारतीचे नाव पासपोर्ट भवन असेच ठेवण्यात आले आहे. या ठिकाणचे कार्यालय एकूण १५ हजार चौरस फुटांचे आहे. त्याचबरोबर या ठिकाणी गाड्यांच्या पार्किंगची पुरेशी सोय आहे. 

नव्या पासपोर्ट कार्यालयाच्या निर्मितीसाठी १७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ५० लाख रुपये परराष्ट्र मंत्रालयाने मंजूर केले आहेत. 

गेल्यावर्षी सर्वाधिक पासपोर्ट जारी
गेल्या वर्षी २०१८ मध्ये पाच वर्षांतील सर्वाधिक पासपोर्ट जारी करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. २०१८ मध्ये एकूण ४,१२,१५३ पासपोर्ट जारी करण्यात आले आहेत. वर्षभरात पासपोर्ट जारी करण्याची संख्या ७५,४५२ ने वाढली आहे.