पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यातील खडकी, मोशी, उत्तमनगर बाजार आजपासून बंद

दीपक म्हैसेकर

पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा धोका टाळण्यासाठी पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील मुख्य बाजार सह खडकी, मोशी, उत्तमनगर आदी उपबाजार आजपासून (दि.१० एप्रिल) बंद राहणार आहेत. या सर्व मार्केट मधील फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा बाजार आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

कोरोनामुळे अखेर चीनमध्ये श्वानाचे मांस विकण्यास बंदी

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी पुण्यातील या सर्व मार्केट मधील विविध विभाग बंद राहणार आहेत. फळे, भाजीपाला विभागासह कांदा-बटाटा बाजार पूर्णपणे बंद राहतील. या सर्व बाजारातील भुसार आणि कडधान्य विभाग मात्र सुरु राहणार आहेत. सर्व शेतकरी आडते, व्यापारी, कामगार व टेम्पो चालक या सर्व बाजार घटकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.

लॉकडाऊनः लेकाला आणण्यासाठी मातेचा स्कुटीवरुन १४०० KM प्रवास

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:punes khadki moshi uttamnagar market closes from today says divisional commissioner deepak mhaisekar amid outbreak of coronavirus