पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जीममधील अतिव्यायामाने पुण्यातील तरुणाची किडनी निकामी

नोबेल रुग्णालयातील डॉ. अविनाश

व्यायामशाळेत (जीम) अतिव्यायाम केल्यामुळे पुण्यातील आकुर्डीमध्ये राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणाचे मूत्रपिंड (किडनी) निकामी झाले. rhabdomyolosis असे या आजाराचे नाव आहे. अतिव्यायाम, अतिश्रम यामुळे हा आजार होतो, असे डॉक्टरांनी सांगितले. भारतात लाखभर लोकांना हा आजार असून, त्यामध्ये शरीरातून मायग्लोबिन नावाची अपायकारक प्रथिने रक्तात मिसळली जातात. ज्यामुळे किडनी निकामी होते. 

राहुल असे नाव असलेल्या तरुणाने सांगितले. खूप दिवसांनी मी जीममध्ये गेलो. पहिल्याच दिवशी मी ५० किलोचे वजन घेऊन सुमारे दोन तास व्यायाम केला. घरी गेल्यावर मला स्नायूंमध्ये खूप वेदना होऊ लागल्या. त्याचबरोबर माझ्या लघुशंकेचा रंगही बदलला. वेदना असह्य होत असल्यामुळे मी डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी मला तातडीने मोठ्या रुग्णालयात जाण्यास सांगितले.

नोबेल रुग्णालयातील किडनीविकार विभागाचे तज्ज्ञ डॉ. अविनाश म्हणाले, कमी वेळेमध्ये पिळदार शरीर कमाविण्यासाठी अनेक तरुण जीममध्ये जातात. त्यांना खूप कमी कालावधीमध्ये शरीरात बदल झालेले हवे असतात. या प्रकरणामध्ये राहुल याने खूप दिवसांच्या विश्रांतीनंतर अचानक एक दिवस जीममध्ये जाऊन दोन तास व्यायाम केला. त्यामुळे त्याला rhabdomyolosis हा आजार झाला. जेव्हा तो आमच्याकडे आला, त्यावेळी त्याच्या दोन्ही किडन्यांनी काम करणे थांबवले होते. मग आम्ही त्याला दोन आठवडे डायलिसिसवर ठेवले. 

जीममध्ये अतिव्यायाम केल्यामुळे ही स्थिती उदभवली, असे डॉक्टरांनी सांगितले. ते म्हणाले, जीममध्ये त्याने सलग दोन तास वजन घेऊन व्यायाम केला. त्यामुळे त्याच्या शरीरातून अपायकारक प्रथिने रक्तात मिसळली. किडनीच्या माध्यमातून ती बाहेर फेकली जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याच्या किडनीवरच त्याचा परिणाम झाला. 

इंडियन सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजीच्या पुणे शाखेचे संस्थापक सदस्य डॉ. आंबेकर म्हणाले, अशा स्वरुपाचा आजार अत्यंत धोकादायक असतो. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असते. अतिव्यायाम, अतिश्रम यामुळे हा आजार उदभवतो. अचानक खूप वेळ आणि जास्त वजन घेऊन व्यायाम करणाऱ्या कोणालाही हा आजार होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.