पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्याजवळ पाण्यात बुडून एका मुलाचा मृत्यू

पुण्यात बुडून एकाचा मृत्यू

चाकणजवळील मोई गावात पाण्याने भरलेल्या दगडखाणीत पोहायला गेलेल्या एका मुलाचा बुडून मृत्यू झाला. गौतम सुधीर निष्ठूर (वय १७, रा. जाधव वाडी, चिखली) असे या मुलाचे नाव आहे. त्याचा मृतदेह शनिवारी सकाळी एनडीआरएफच्या पथकाने बाहेर काढला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम त्याच्या मित्रांसोबत शुक्रवारी संध्याकाळी या ठिकाणी पोहायला गेला होता. पोहताना अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याला शोधण्याचा त्याच्या मित्रांनी प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. स्थानिक लोकांनीही खाणीमध्ये उतरून त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही यश आले नाही. यानंतर एनडीआऱएफच्या पथकाला याची माहिती देण्यात आली. 

एनडीआरएफच्या पथकाने खाणीमध्ये बुडालेला त्याचा मृतदेह शनिवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास बाहेर काढला. गौतमच्या निधनामुळे त्याच्या गावात शोककळा पसरली आहे. पोलिस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.