पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणे दुर्घटना : इमारतीचे बांधकाम थांबविण्याचे महापौरांचे आदेश

कोंढव्यातील घटनास्थळाचे छायाचित्र

पुण्यातील कोंढवा बुद्रूक भागात ज्या ठिकाणी सुरक्षा भिंत कोसळून मजुरांचा मृत्यू झाला. त्या ठिकाणी सुरू असलेले इमारत बांधण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित बांधकाम व्यावसायिकाला देण्यात आले असल्याचे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी शनिवारी सांगितले.

कोंढव्यातील अल्कन स्टायलस सोसायटीची सुरक्षा भिंत कोसळून शुक्रवारी रात्री १५ मजुरांचा मृत्यू झाला. या भिंताला लागून असलेल्या रिकाम्या जागेवर नव्या इमारतीचे बांधकाम सुरू होते. या बांधकामावर काम करीत असलेल्या मजुरांच्या पत्र्याच्या झोपड्या सुरक्षा भिंतीला लागूनच उभारण्यात आल्या होत्या. सुरक्षा भिंत कोसळल्यामुळे त्याचा ढिगारा झोपड्यांवर पडल्यामुळे दबून मजुरांचा मृत्यू झाला.

पुण्यातील दुर्घटनेची सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुक्ता टिळक यांनी शनिवारी घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणी महापालिकेने आतापर्यंत कोणकोणत्या परवानग्या दिल्या आहेत, हे सर्व तपासले जाईल, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर संबंधित बांधकाम व्यावसायकीला काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:pune wall collapsed mayor mukta tilak says I have ordered work stop order for an under construction site