पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हेल्मेटसक्तीनंतर पुणे पोलिस मालामाल, दंडाच्या महसुलात लक्षवेधी वाढ

पुणे पोलिस

पुणे शहर वाहतूक पोलिसांनी २०१८ मध्ये संपूर्ण वर्षभरात वाहन चालकांकडून गोळा केलेल्या दंडाची रक्कम होती ३,९५,८०,५०० आणि चालू वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत गोळा केलेल्या दंडाची रक्कम आहे ४०,९३,७७,००० रुपये. हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर डिसेंबर-जानेवारीपासून कारवाईचा बडगा उगारल्यानंतर पुणे शहरातून पोलिसांनी इतक्या मोठ्या प्रमाणात महसूल गोळा केला आहे. पोलिसांनीच ही माहिती दिली.

पोलिस खात्यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी पुण्याच्या आयुक्तांचे नवे पाऊल 

वाहनचालकांनी वेगवेगळ्या वाहतुकीच्या नियमांचे पालन केले नाही, तर त्यांच्याकडून वाहतूक पोलिस दंड वसूल करतात. यामध्ये सिग्नल न पाळणे, लेन कटिंग, वाहन परवाना सोबत न बाळगणे, हेल्मेट न घालणे यांचा समावेश आहे. गेल्या डिसेंबर-जानेवारीपासून पुणे पोलिसांनी हेल्मेट सक्ती केली आहे. पुणे शहरात दुचाकी चालविताना हेल्मेट घातले नाही, तर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. कायद्याप्रमाणे दुचाकी चालविताना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. पुण्यात याची सक्तीने अंमलबजावणी गेल्या जानेवारीपासून सुरू करण्यात आली. त्यानंतर पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या दंडाच्या वसुलीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या जानेवारी ते मे या काळात वाहनचालकांकडून जो दंड वसूल करण्यात आला. त्यापैकी ८० ते ९० टक्के रक्कम ही केवळ हेल्मेट घातले नाही, म्हणून दुचाकीस्वारांकडून वसुल करण्यात आली. 

२०१८ मध्ये संपूर्ण वर्षभरात वाहतूक पोलिसांनी एकूण ३,९५,८०,५०० रुपये इतका दंड वसूल केला. त्यापैकी एकट्या डिसेंबरमध्ये पोलिसांनी २,०२,७४,००० रुपये वसुल केले. डिसेंबरमध्येही पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे त्या महिन्यात दंडाच्या वसुलीत एकदम वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 

वाहतूक शाखेच्या पोलिसांचे ४ ते ५ जणांचे एक पथक तयार करण्यात आले. या पथकाची वेगवेगळ्या चौकामध्ये नेमणूक करण्यात आली. हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या किमान २०० जणांकडून रोज दंड वसुल करण्याचे लक्ष्यच त्यांना निश्चित करून देण्यात आले. त्याचाच परिणाम म्हणजे दंडाच्या वसुलीत झालेली वाढ असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुण्यात १३ प्रमुख ठिकाणी मोठे बदल

पुण्याचे पोलिस आयुक्त के. वेंकटेशम म्हणाले, वाहतुकीच्या विविध नियमांचे उल्लंघन केले म्हणून वसुल करण्यात आलेल्या दंडाची रक्कम ४० कोटी रुपये आहे. पण यापैकी ८० ते ९० टक्के रक्कम ही केवळ हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांकडून वसूल करण्यात आली आहे. जोपर्यंत शहरातील प्रत्येकजण दुचाकी चालविताना हेल्मेट घालत नाही, तोपर्यंत पोलिसांची कारवाई सुरूच राहिल.