पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणे: वाघोलीत तलावात बुडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू

तलावात बुडून तिघांचा मृत्यू

पुण्यामध्ये तिघांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वाघोली परिसरात ही घटना घडली आहे. मुलगा तलावामध्ये बुडत असल्याचे पाहून आईने त्याला वाचवण्यासाठी तलावात उडी मारली. या दोघांना बुडताना पाहिल्यानंतर एका व्यक्तीने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तिघांचा बुडून मृत्यू झाला. लोणीकंद पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. 

'वाडिया रुग्णालयाचा निधी मिळेल, पण आंबेडकर स्मारक झालेच पाहिजे'

रोहिणी संजय पाटोळे (४० वर्ष), स्वप्नील संजय पाटोळे (१२ वर्ष) आणि दत्तात्रय रघुनाथ जाधव (४२ वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. रोहिणी कपडे धुण्यासाठी तलावावर आल्या होत्या. त्याचवेळी स्वप्नील पाण्यात बुडत असल्याचे पाहून रोहिणी यांनी त्याला वाचविण्यासाठी तलावात उडी मारली. मात्र ते दोघेही बुडू लागले. यामुळे या दोघांना वाचवण्यासाठी दत्तात्रय जाधव यांनी तलावात उडी घेतली. यामध्ये तिघांचाही तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. 

हवी तेवढी निदर्शने करा, CAA मागे घेणार नाही - अमित शहा

दरम्यान, या घटनेची माहिती कळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती कळताच वाघोली येथे राहणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. तिघांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पोलिस तपास करत आहेत.

अशोभनीय, निंदनीय...नव्या व्हिडिओवर संभाजीराजे