पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिहारला कधीच न गेलेल्या पुण्यातील तरुणावर तिथे बलात्काराचा गुन्हा, दोन पोलिस निलंबित

पुणे पोलिस

बिहारमध्ये कधीच न गेलेल्या पुण्यातील एका तरुणावर तेथील एका महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बिहार पोलिस दलातील ज्या कर्मचाऱ्यांनी या तरुणाला पुण्यातून अटक करून बिहारमध्ये नेले, त्यांना निलंबित करण्यात आले आहे. पण संबंधित तरूण अद्याप बिहारमधील बेतिया येथील कारागृहात अटकेत आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बिहार पोलिस दलातील दोघेजण ३० मार्चला पुण्यात आले. त्यांनी झोरार शेरकर (वय २२) या तरुणाला ताब्यात घेतले. झोरार पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेतो आहे. ४४ वर्षांच्या एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून त्याला अटक करण्यात आली. 

अनंतनागमध्ये एका दहशतवाद्याला ठार मारण्यात यश

या संदर्भात झोरारची आई डॉ. नुसरित शेरकर म्हणाल्या, अटक वॉरंट घेऊन ते दोघे पोलिस आले होते. बिहारमधून विमानाने ते येथे आले आणि माझ्या मुलाला घेऊन निघून गेले. ज्या महिलेने तक्रार दाखल केली आहे. तिने असे म्हटले आहे की ती आमच्या घरामध्ये काम करीत होती आणि माझ्या मुलाचे तिच्याशी शारीरिक संबंध होते. जर ती आमच्या घरामध्ये काम करीत होती. तर मग तिने बिहारमध्ये कशी काय तक्रार दाखल केली, असा प्रश्न डॉ. शेरकर यांनी उपस्थित केला.

बिहारमधून आलेल्या पोलिसांकडे अटक वॉरंट होते. त्यामुळे आम्ही काहीच बोलू शकलो नाही. त्यांना सहकार्य करणे आमचे काम होते, असे समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी सांगितले. 

बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या करण ओबेरॉयला जामीन मंजूर

विनोद कुमार सिंग आणि कृष्णकुमार या दोघांनी झोरारला पुण्यात अटक केली. पण खटल्याच्या तपासात अक्षम्य दुर्लक्ष करणे आणि त्यामध्ये फेरफार केल्याच्या आरोपावरून बिहारमधील विभागीय पोलिस महासंचालक नय्यर हसनैन खान यांनी या दोघांना निलंबित केले आहे. 

दरम्यान, बेतियामधील स्थानिक न्यायालयात झोरारच्या जामिनावर येत्या सोमवारी सुनावणी होईल. त्यानंतरच तो पुण्यात कधी परतणार हे स्पष्ट होईल. 

नय्यर हसनैन खान यांनी 'हिंदूस्थान टाइम्स'ला सांगितले की, या प्रकरणात पोलिसांकडून तपासात अक्षम्य चूक झाल्याचे सकृतदर्शनी दिसून येते आहे. जो तरूण कधीच बिहारला आलेला नाही. त्याने बिहारमध्ये एका महिलेवर बलात्कार कसा केला, याबद्दल पोलिसांनी तपास केलेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.