पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणे विद्यापीठासह महाविद्यालयीन निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर

पुणे विद्यापीठ

राज्यामध्ये सध्या महाविद्यालयीन निवडणुकीचे वारे वाहत आहेत. मुंबईतील महाविद्यालयीन निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता पुणे विद्यापीठातील विद्यार्थी परिषद निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. पुण्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी परिषद निवडणुकीसाठी 7 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. तर विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषदेसाठी 24 सप्टेंबर रोजी मदतान होणार आहे. 

धोनीबाबतच्या प्रश्नावर एमएसके प्रसाद यांचा मास्टर स्ट्रोक

पुणे महाविद्यालय विद्यार्थी परिषदेसाठी वर्ग प्रतिनिधी, अध्यक्ष, सचिव, मागास प्रवर्ग प्रतिनिधी आणि महिला प्रतिनिधी या पदांकरिता निवडणूक होणार आहे. पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रतिनिधी निवडण्यासाठी येत्या 7 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. तर त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीची प्रक्रिया 21 ऑगस्टपासूनच सुरु होणार आहे. 

दिल्लीत २०० युनिटपर्यंत वीज मोफत, केजरीवाल यांचा निर्णय

त्यानंतर, पुणे विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषदेसाठी विभाग प्रतिनिधी, अध्यक्ष, सचिव, मागास प्रवर्ग प्रतिनिधी आणि महिला प्रतिनिधी या पदांकरिता निवडणूक होणार आहे. विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषदेसाठी २४ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 27 सप्टेंबर रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीची प्रक्रिया 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. 

जनगणना २०२१ हायटेक, स्वतः ऑनलाईन माहिती भरण्याची सुविधा