पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात भरधाव ट्रकची एसटीला धडक; एसटी चालक-वाहकाचा मृत्यू

अपघात (प्रतिकात्मक छायाचित्र)

पुण्यामध्ये भरधाव ट्रकने एसटी बसला धडक दिली. या अपघातामध्ये एसटी चालक आणि वाहकाचा मृत्यू झाला आहे. तर ५ प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबई- बंगळुरु महामार्गावरील बावधन येथे ही घटना घडली आहे. एसटीचा पंक्चर झालेला टायर बदलत असताना ट्रकने एसटीला धडक दिली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. पुणे पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे. 

सुप्रीम कोर्टः मुस्लिम पक्षकारांच्या वकिलाने राम मंदिराचा नकाशा फाडला

मुंबई सेंट्रलवरुन भोरला जाणाऱ्या एसटीला हा अपघात झाला आहे. मुंबई-बंगळुरु महामार्गावरील बावधन येथे अचानक एसटीचा टायर पंक्चर झाला. त्यामुळे तो टायर काढून दुसरा टायर लावण्यासाठी एसटीचा चालक आणि वाहक खाली उतरले. हे काम करत असताना मागून आलेल्या भरधाव ट्रकने एसटीला धडक दिली. 

कामगार कपातीची चर्चा फोल?, पारले बिस्किटचा नफा १५ टक्क्यांनी वाढला

या धडकेमध्ये मोहन बांदल आणि शंकर चव्हाण हे गंभीर जखमी झाले. त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र दोघांचाही  मृत्यू झाला. तर अपघातामध्ये एसटीतील ५ प्रवासी देखील जखमी झाले आहेत. याप्रकरणी पुणे पोलिसांनी ट्रक चालक राजीव सुंदरम गांधी (३६ वर्ष) याला अटक केली असून तो तमिळनाडू येथे राहणारा आहे. पोलिसांकडून त्याची चौकशी सुरु आहे. 

INX मीडिया प्रकरणी चिदंबरम यांना ED कडून अटक