पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणे-सोलापूर महामार्गावरील विचित्र अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अरण ता. माढा येथे रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. महिंद्रा टी यु व्ही क्र. एम एच ०५ डि.एच ७६४० या क्रमांकाचे चारचाकी वाहन मुंबईहून सिकंदराबादच्या दिशेने जात होते. अरण जवळ चालकाचे वाहनावरील  नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. यात चारचाकी वाहनातील एका महिलेसह दुचाकीवरुन जात असलेल्या दोघांचा मृत्यू झाला.

सावरकरांच्या 'त्या' विचाराशी BJP द्रोह करत आहे का? CM ठाकरेंचा सवाल

चारचाकी वाहनाने पहिल्यांदा लाल रंगाच्या स्कूटी क्र.एम एच १३ डि जे ७४९६ वरील राजेंद्र तुकाराम रंदवे वय ५५ व रविकिरण साळुंखे वय ३३ दोघे रा. पालवण ता. माढा यांना ठोकरले. त्यानंतर लाल रंगाच्या हिरो होंडा फॅशन क्र. एम एच १३ ए एस ८८४३ वरील  रजाक उर्फ (बापू ) कोरबु व शकील कोरबु रा. पेनुर ता. मोहोळ आणि काळ्या रंगाच्या हिरो होंडा शाइन क्र. एम एच १३ सी एम १०७३ वरील शिवाजी नागनाथ शिंदे वय - रा कोंढी यांना धडक देत महिंद्रा गाडी रस्ता दुभाजकावरून फरफटत सुमारे दीडशे फूट अंतरावर जाऊन पलटी झाली.

काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधींच्या पुनरागमनाची शक्यता

यात वाहनामध्ये असलेल्या प्रतिभा उसाई या महिलेचा आणि एका दुचाकीवरील पेनुर येथील रजाक उर्फ बापू कोरबु आणि शकील कोरबु रा. पेनुर ता. मोहोळ या काका पुतण्यांचा जागीच मृत्यू झाला. यात पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णवाहीकेतून मोडनिंब आणि टेंभुर्णी येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. रजाक उर्फ बापू कोरबू आणि शकील कोरबू हे दोघे काका पुतणे मुळचे देगाव वाळूज या गावातील असून पेनुर येथे पंढरपुर-सोलपुर महामार्गावर दुचाकी, चारचाकी वाहनांचे टायर पंक्चर काढण्याचे दोघांचे वेग वेगळ्या ठिकाणी व्यवसाय होते.  नाते वाईकाच्या विवाह सोहळ्याला चालले असताना त्यांच्यावर काळाने घावा घातला.