पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानक आजपासून वाकडेवाडीला

एसटी बस

पुण्यातील शिवाजीनगरमधील एसटीचे बसस्थानक आणि आगार सोमवारपासून (३० डिसेंबर २०१९) वाकडेवाडीला स्थलांतरित करण्यात आले आहे. पुणे मेट्रोच्या कामासाठी हा बदल करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना बस पकडण्यासाठी वाकडेवाडीला जावे लागणार आहे. शिवाजीनगर आगार व्यवस्थापकांनी परिपत्रक काढून या बदलाची माहिती दिली आहे.

मंत्रिमंडळ विस्तार: 'हे' नेते मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता

पुण्यात शिवाजीनगर, स्वारगेट आणि पुणे स्टेशन अशी तीन बसस्थानके आहेत. सध्या पुण्यात मेट्रोचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या आवारातही मेट्रोचे काम सुरू होत आहे. त्यामुळेच येथील बसस्थानक हलविण्यात आले आहे. शिवाजीनगर येथील बसस्थानक हलविण्यात येणार असल्याची माहिती आधीपासूनच देण्यात आली होती. 

शिवाजीनगरमधून नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांसाठी बस सुटतात. त्यामुळे या सर्व बसेस आता वाकडेवाडी येथून सुटतील आणि तिथेच येतील.

'भारत जगातील पाचवी सर्वांत मोठी इकॉनॉमी, फ्रान्स-ब्रिटनला टाकले मागे'

पुण्यातील प्रवाशांना या बदलाचा फटका बसणार आहे. प्रवाशांना बस पकडण्यासाठी आता वाकडेवाडीपर्यंत जावे लागणार असल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.