पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कौतुकास्पद! पुण्याच्या मूर्तीकाराकडून पूरग्रस्तांसाठी अनोखी भेट

पुण्यातील मूर्तीकार लांजेकर

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाने घातलेल्या थैमानाने सांगली-कोल्हापूर भागात महापूराचा मोठा फटका बसला. अनेक घरे पाण्याखाली गेली. पूर ओसरल्यानंतर राज्यभरातून या भागातील पूरग्रस्तांच्या मदतीचा महापूर आल्याचे चित्र पाहायला मिळाले. माणसूकीचं भान ठेवून अनेक सामाजिक संस्था आणि लोक मदतीसाठी सरसावले. या मदतीच्या आधारे अनेक कुंटुबे हळूहळू सावरत आहेत. 

अन्न, वस्त्र यासारख्या मदतीनंतर आगामी गणेशोत्सवाचा सण लक्षात घेता एका पुणेकराने  पुरग्रस्त भागात मोफत गणेश मूर्ती पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील गणपती बाप्पाच्या मूर्ती तयार करणारे मूर्तीकार गणेश दशरथ लांजेकर यांनी सांगली आणि कोल्हापूर मधील पूरग्रस्त भागात ५ हजार बापाच्या मूर्ती मोफत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. गणपती बाप्पाची मूर्ती तयार करणारी आमची तिसरी पिढी आहे. आमच्या तिन्ही पिढ्यांनी बाप्पाची मनोभावे सेवा केली आहे. आम्ही अनेक संकटाचा सामना करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. याच बांधिलकीतून यंदा कोल्हापूर आणि सांगली भागातील पूरग्रस्तांसाठी गणेश मूर्तीच्या माध्यमातून मदत करणार असल्याचे लांजेकर यांनी म्हटले आहे. 

पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी, घर बांधणीसाठी अतिरिक्त १ लाखाची मदत

सांगली-कोल्हापूर भागातील हजारो घरांचे नुकसान झाले. तेथील कुटुंबांना पुन्हा त्याच ताकदीने नव्याने उभे राहण्यासाठी काही कालावधी लागणार आहे.  आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन आठवड्याभरावर आले आहे. यामुळे सर्वत्र त्याच्या आगमनाची जय्यत तयारी करताना दिसत आहे. कोल्हापूर आणि सांगली येथील बांधव हा सण कसा साजरा करणार असा विचार आमच्या सर्वांच्या मनात आला. त्यानंतर आमच्या क्षेत्रातील काही मंडळी एकत्रित येत तेथील नागरिकांना बाप्पाची मूर्ती देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. ऑगस्ट महिन्याच्या ३० तारखेला ५ हजार बाप्पाच्या मूर्ती घेऊन ट्रक सांगली-कोल्हापूरच्या दिशेने रवाना होतील. त्या-त्या भागातील तहसीलदारांच्या हस्ते बाप्पाच्या मूर्तीचे वाटप नागरिकांना केले जाईल अशी माहितीही लांजेकर यांनी दिली आहे.  

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वेळ प्रसंगी कर्ज काढू: चंद्रकांत पाटील