पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आधी फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट आली अन् मग सहा लाख गेले!

प्रातिनिधिक छायाचित्र

फेसबुकच्या माध्यमातून एका शिक्षिकेची सहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सिंहगड रोड पोलिस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहिनी आनंद यादव यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीमध्ये मोहिनी यादव यांना जेम्स स्मिथ म्हणून एका व्यक्तीची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांना आपले मोबाईल नंबर दिले. जो मोबाईल नंबर मोहिनी यादव यांना देण्यात आला होता. तो इंग्लंडचा होता. आरोपीने त्यावेळी एक गिफ्ट पाठवित असल्याचे मोहिनी यादव यांना सांगितले. आपण लवकरच भारतात येणार असल्याचेही आरोपीने मोहिनी यादव यांना सांगितले.

VIDEO : भाजप आमदाराचा प्रताप; हातात शस्त्र घेऊन डान्स

त्यानंतर मोहिनी यादव यांना एका महिलेचा फोन आला होता. आपण सीमाशुल्क विभागातून बोलत असल्याचे पलीकडच्या महिलेने सांगितले. या फोननंतर मोहिनी यादव यांनी वेगवेगळ्या खात्यामध्ये पैसे भरले. वेगवेगळ्या कारणांमुळे हे पैसे भरण्यात आले. ज्यामध्ये सीमा शुल्क, कुरिअर कर इत्यादी कारणांचा समावेश आहे. तक्रारदार महिलेने एकूण ६ लाख ५ हजार रुपये विविध खात्यांमध्ये भरले.

या प्रकरणी भारतीय दंडविधान संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.