पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणेःराजीव गांधी प्राणी संग्रहालयातील सिंह 'तेजस'चा पक्षाघातामुळे मृत्यू

तेजस सिंह

पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात ९ वर्षांचा आशियाई सिंह तेजस हा मागील महिन्याभरापासून पक्षाघातामुळे आजारी होता. या सिंहाचा शुक्रवारी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

चंद्रपूरः घरात झोपलेल्या चिमुकल्याला बिबट्याने पळवले

गुजरातमधील सक्करबाग प्राणी संग्रहालयातील आशियाई सिंह तेजस आणि सिब्बू यांना अडीच वर्षांपूर्वी पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आणण्यात आले होते. राज्यातील एकमेव आशियाई सिंहाची जोडी तेजस आणि सिब्बू होती. ही जोडी पाहण्यास पर्यटक मोठ्या संख्येने येत असत. मात्र मागील महिन्यापासून पक्षाघातामुळे आजारी असलेल्या तेजसवर उपचार सुरू असताना शुक्रवारी मृत्यू झाला.