पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात खडकवासलातून पुन्हा विसर्ग, बाबा भिडे पूल पाण्याखाली

खडकवासला धरण

पुणे शहर आणि परिसरात मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्यात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणातून बुधवारी सकाळपासून २७२०३ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातून काल रात्रीपासूनच पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे डेक्कन परिसरातील बाबा भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. त्याचबरोबर नदीपात्रातील रस्ताही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 

चांद्रयान २ मधील अंतिम टप्पाही यशस्वी, शनिवारी चंद्रावर उतरणार

गेल्या तीन आठवड्यांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुण्यात पुन्हा एकदा पुनरागमन केले आहे. मंगळवारी रात्रीपासून पुण्यात मुसळधार पडण्यास सुरुवात झाली आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणारी खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला ही सर्व धरणे १०० टक्के भरली आहेत. त्यामुळे आता धरणात येणारे पाणी सोडावे लागणार आहे. धरणात येणाऱ्या पाण्याच्या नुसार विसर्ग वाढविण्यात किंवा कमी करण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाने कळविले आहे.

तरुणाची स्कूटी १५ हजारांची अन् चलान फाडले २३ हजार

मुळशी धरणातून बुधवारी सकाळपासून १५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आला आहे. धरणात येणाऱ्या पाण्यानुसार पाण्याचा विसर्ग वाढविलाही जाऊ शकतो, अशी माहिती देण्यात आली आहे.