पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुराच्या पाण्यामुळे पुण्यात गाड्यांचे कोट्यवधींचे नुकसान

पूराच्या पाण्यामुळे गाड्यांची अवस्थी अशी झाली होती. (हिंदुस्थान टाइम्स)

पुण्यात बुधवारी रात्री पडलेला अतिप्रचंड पाऊस आणि त्यामुळे ओढे आणि नाल्यांना आलेला पूर यामुळे सर्वाधिक नुकसान चारचाकी आणि दुचाकी गाड्यांचे झाले आहे. पुराच्या पाण्यात अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. तर हजारो गाड्या तळघरातील वाहनतळामध्ये अडकून पडल्या आहेत. यामुळे या गाड्याचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

तिकीट वाटप राहू द्या, आधी पुण्यातील स्थिती हाताळा; छगन भुजबळांचा टोला

पुण्यात बुधवारी रात्री आठनंतर जोराचा पाऊस सुरू झाला. पुण्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर सर्वाधिक होता. रात्री उशीरापर्यंत पाऊस सुरू होता. यामुळे या भागातील आंबिल ओढा आणि नाल्यांना पुढच्या काही तासांत पूर आला. अचानक घडलेल्या या सर्व प्रकारामुळे कात्रज, सहकारनगर, पद्मवती, कोंढवा, नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता), वारजे, वानवडी या भागांत राहणाऱ्या अनेक लोकांच्या दुचाकी गाड्या वाहून गेल्या आहेत. अनेक ठिकाणी चारचाकी गाड्या एकमेकांवर चढल्याचे गुरुवारी सकाळी पाहायला मिळाले. पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की मोठ मोठे ट्रकही आपल्या जागेवरून हलून दुसऱ्या ठिकाणी गेल्याचे गुरुवारी सकाळी पाहायला मिळाले.

सहकार नगर भागातील ट्रेझर पार्क त्याचबरोबर सातारा रस्ता भागातील के के मार्केटमध्ये भूमिगत वाहनतळामध्ये काठोकाठ पाणी भरले आहे. त्यामुळे या ठिकाणी लावलेल्या गाड्या पाण्यात अडकल्या आहेत. ट्रेझर पार्कमध्ये सुमारे ३०० पेक्षा चारचाकी आणि ५००च्या आसपास दुचाकी गाड्या पाण्याखाली आहेत. भूमिगत वाहनतळातील पाणी काढले जात नाही, तोपर्यंत या गाड्या बाहेर काढता येणार नाही.

कऱ्हा नदीच्या पूराचे पाणी बारामती शहरासह नदीकाठच्या गावात शिरले

दुचाकी आणि चारचाकी गाड्या वाहून गेल्यामुळे, पाण्याखाली सापडल्यामुळे आणि त्यामध्ये वाहून आलेला कचरा अडकल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हजारो गाड्यांची दुरुस्ती केल्याशिवाय त्या रस्त्यावर आणल्याच जाऊ शकत नाही. पुराच्या पाण्यामुळे गाड्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीवरून पुढे आले.