पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्याला पावसाने झोडपले; शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

पुणे पाऊस

परतीच्या पावसाने पुण्याला अक्षरश: झोडपून काढले. दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावासाचा जोर रात्री वाढला. या पावसामुळे अनेक भागातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. पावसामुळे शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. अनेक रहिवासी वस्ती, इमारतीमध्ये नागरिक अडकले आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न प्रयत्न एनडीआरएफच्या जवानांकडून सुरु आहे. सध्या पुण्यात पावासाने विश्रांती घेतली आहे. तर, पुण्यातील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मोदींच्या फोटोसह झळकणाऱ्या जाहिराती हटवण्याचे आदेश

पुण्याच्या खडकवासला परिसरातील कोल्हेवाडीतील इमारतीमध्ये पाणी शिरले आहे. याशिवाय कात्रज, पद्मावती, कोथरुड परिसरातील अनेक घरात पाणी शिरले आहे. पुणे शहरातील दांडेकर पूलाजवळील दांडेकर वस्ती, आंबील ओढा परिसरात पाणी शिरले आहे. अग्निशमन दलाचे जवान, एनडीआरएफची टीम स्थानिक नागरिकांच्या मदतीने अडकलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलवत आहे. अतिवृष्टीमुळे पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. पुणे शहरासह पुरंदर, बारामती, भोर आणि हवेली तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

'येवले चहा'ला 'एफडीए'चा दणका, उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश

पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी उभ्या असलेल्या गाड्या वाहून गेल्या आहेत.कात्रज परिसरातील नवीन बोगद्याजवळ महामार्गावर दरड कोसळल्यामुळे पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर, दुसरीकडे सासवडमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. कऱ्हा नदीला पूरजन्यपरिस्थिती निर्माण झाली आहे.  परिणामी सासवड ते नारायणपूर रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.