पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एल्गार परिषदेतील संशियत हनी बाबूंच्या नोएडातील घरी पुणे पोलिसांचा छापा

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील एल्गार परिषद आणि त्यानंतर उसळलेल्या दंगल प्रकरणातील संशयित आणि दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक हनी बाबू यांच्या नोएडातील निवासस्थानी पुणे पोलिसांच्या पथकाने मंगळवारी छापा टाकला. यावेळी त्यांच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही.

इम्रान खान यांच्या पक्षाच्या नेत्याने भारतात मागितले शरण

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडातील सेक्टर ७८ मध्ये असलेल्या हनी बाबू यांच्या निवासस्थानी पुणे पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या पूर्ण छाप्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. पोलिसांनी छाप्यांमध्ये काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. पण या ठिकाणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 

तयारी विधानसभेची!, शरद पवारांनी घेतली सोनिया गांधींची भेट

पुणे पोलिसांच्या पथकामध्ये गुन्हे शाखेचे उपायुक्त बच्चन सिंग, या प्रकरणाचे तपास अधिकारी आणि सहायक पोलिस आयुक्त शिवाजी पवार, सायबर विषयातील तज्ज्ञ आणि इतरांचा समावेश होता. उत्तर प्रदेश पोलिसांची यावेळी मदत घेण्यात आली होती.