पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यातील जुना बाजार बंद, महिन्याभरासाठी प्रायोगिक अंमलबजावणी

पुणे पोलिसांनी हा आदेश जारी केला आहे. (संग्रहित छायाचित्र)

पुण्यातील जुना बाजार भरणाऱ्या शाहीर अमर शेख चौक ते कुंभारवेस या मार्गावर पुणे पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वांवर एक महिन्यासाठी वाहने लावण्यास आणि जुना बाजारातील व्यावसायिकांना त्यांचे तात्पुरते दुकान थाटण्यास बंदी घातली आहे. यामुळे जुना बाजारातील छोट्या व्यावसायिकांनी बुधवारी सकाळी या ठिकाणी आंदोलन केले. आमच्याशी कोणतीही चर्चा न करता हा निर्णय घेण्यात आला आहे. आमचे पोट या व्यवसायावर अवलंबून असल्याचे या व्यावसायिकांनी म्हटले आहे.

कर्नाटक सरकार पडल्यानंतर प्रियांका गांधींचे भाजपला सणसणीत प्रत्युत्तर

पुण्यातील वाहतूक कोंडी आणि वाहनांची वाढती संख्या हा पोलिसांसमोरील मोठा प्रश्न आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी सातत्याने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुण्याचे पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी मंगळवारी आदेश जारी केले आहेत. त्यानुसार शाहीर अमर शेख चौक ते कुंभारवेस या मार्गावर दोन्ही बाजूला वाहने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी दर बुधवारी आणि रविवारी भरणाऱ्या जुना बाजारावरही महिन्याभरासाठी बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला असल्याचे आदेशात म्हटले आहे.

हा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर असून, त्याचे परिणाम बघून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, शाहीर अमर शेख चौक ते कुंभारवेस या मार्गावर रुग्णवाहिका, अग्निशामक दलाची वाहने, अधिकृत रिक्षा थांबे यांना या आदेशातून सवलत देण्यात आली आहे.

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ

जुन्या बाजारामध्ये शेकडो छोटे व्यावसायिक आपली दुकाने लावतात. या ठिकाणी विविध वस्तू विकण्यासाठी ठेवलेल्या असतात. त्यावर यामुळे निर्बंध आले आहेत.