पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास NIAला देण्यास पुणे पोलिसांचा नकार

एनआयए (संग्रहित छायाचित्र)

भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या तपासाची कागदपत्र पुणे पोलिसांनी एनआयएकडे देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधील संघर्ष तीव्र झाला आहे. एनआयएची टीम तपासाची कागदपत्रं घेण्यासाठी सोमवारी पुण्यामध्ये दाखल झाली होती. मात्र राज्य सरकारच्या परवानगीनंतर आम्ही कागदपत्रांचे हस्तांतर करु असे पुणे पोलिसांनी सांगितले आहे. 

 

'केंद्राने लवकर परवानग्या दिल्या तर महाराष्ट्राचा विकास होईल'

केंद्र सरकारने शुक्रवारी भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून काढून एनआयएकडे देण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार एनआयएच्या तीन अधिकाऱ्यांची टीम सोमवारी तपासाची कागदपत्रं घेण्यासाठी पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात आली होती. मात्र पुणे पोलिसांनी ही कागदपत्र देण्यास नकार दिला आहे. पोलिस महासंचालकांची आणि राज्य सरकारची परवानगी नसल्याने आम्ही ही कागदपत्र देऊ शकत नाही असे पुणे पोलिसांनी सांगितले होते. जेव्हा परवानगी मिळेल त्यानंतर ही कागदपत्र एनआयएला देऊ असे पुणे पोलिसांनी सांगितले.  

CAA नुसार नागरिकत्व मागणाऱ्यांना धर्माचा पुरावा द्यावा लागणार