पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डी एस कुलकर्णींच्या चार नातेवाईकांचा पोलिसांकडून शोध सुरू

महाराष्ट्र पोलिस

सध्या अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या दोन हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारांच्या प्रकरणांमध्ये पुणे पोलिस आता त्यांच्या चार नातेवाईकांचा शोध घेत आहेत. डी एस कुलकर्णी यांच्याविरोधात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे.

शिवसेना सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत, कपिल सिब्बल मांडणार बाजू

डी एस कुलकर्णी यांची मुलगी अश्विनी संजय देशपांडे, सून तन्वी शिरीष कुलकर्णी, नातेवाईक शिल्पा सखाराम कुलकर्णी आणि स्वरुपा सखाराम कुलकर्णी यांचा पोलिस शोध घेत आहेत. या चौघांनीही पुण्यातील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. पण त्यावर अद्याप सुनावणी झालेली नाही. पुण्याजवळील फुरसुंगीमध्ये बेकायदा जमीन व्यवहार प्रकरणी डी एस कुलकर्णी यांना साथ दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

ये सब खेल हो रहा है, ओवेसींचा आघाडी-शिवसेनेला टोला

डी एस कुलकर्णी यांच्याकडून २००६ ते ०८ या काळात फुरसुंगीमधील विशेष आर्थिक क्षेत्रातील (SEZ) जागेचा व्यवहार करण्यासाठी १८४ कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर करण्यात आला, असे या प्रकरणी सरकारी पक्षाचे म्हणणे आहे.