पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणे पोलिसांना मोठे यश; घरफोड्या प्रकरणी ५ जणांना अटक

पुणे पोलिस

पुणे शहारासह ग्रामिण भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून दरोडा आणि घरफोडीच्या घटना घडत आहेत. नागरिकांवर प्राणघातक हल्ला करत हे चोरटे चोऱ्या करत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या चोरट्यांना पकडण्याचे पुणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. अशामध्ये पुणे पोलिसांना मोठे यश आले आहे. जबरी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या ४ सराईत गुन्हेगार आणि एका सोनाराला अटक करण्यात वानवडी पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून  ५० गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून तब्बल ८१ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

फिरोजशहा कोटला स्टेडियम आता जेटलींच्या नावाने ओळखले जाणार

पुणे शहरासह ग्रामिण भागामध्ये घरफोडींच्या घटना वाढत चालल्या होत्या. याची गंभिर दखल घेत वानवडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिसांच्या अध्यक्षतेखाली दोन पथकांची स्थापना करण्यात आली होती. ज्याभागामध्ये घरफोडीच्या घटना घडल्या होत्या त्याभागातील जवळपास ४० सीसीटीव्ही फूटेज या पथकाने मिळवले होते. याचा व्यवस्थित अभ्यास करुन यामधील काही जणांच्या हालचाली लक्षात घेत त्यांनी आरोपींचा शोध घेतला. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून पोलिसांनी ४ सराईत गुन्हेगारांना अटक केली. त्यानंतर एका सोनाराला देखील त्यांनी अटक केली. या सर्वांवर भादवि कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. 

PM मोदींचं कौतुक करणं शशी थरुर यांना महागात पडणार

गोरखसिंग गागासिंह टाक (३० वर्ष), उजाला प्रभुसिंग टाक (२७ वर्ष), जलसिंग रजपुत दुधाणी (२६ वर्ष), बल्लुसिंग प्रभुसिंग टाक, सोनार सत्यनारायण वर्मा असे अटक करण्यात आलेल्या ५ आरोपींची नाव आहेत. या आरोपींना अटक करत असताना त्यांनी केलेल्या हल्ल्यात पोलिस देखील जखमी झाले आहेत. आरोपींकडून गुन्ह्यांसाठी वापरण्यात आलेली कार, पिस्तुल आणि ६ जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. सध्या आरोपींनी ५० घरफोडी केल्याचे कबूल केले आहे. चौकशीतून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. 

बाबा राम रहीमला न्यायलयाचा झटका; पॅरोल याचिका फेटाळली