पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

थकित बिलामुळे CNG वर चालणाऱ्या PMPML ला ब्रेक लागणार

पीएमपीएमएल सेवा विस्कळीत होणार

पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची लाइफ लाइन असलेल्या   पीएमपीएल ला महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) चा पुरवठा आज (शुक्रवार) मध्यरात्रीपासून (दि.२४ मे) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील सीएनजीवर चालणाऱ्या १ हजार २३५ बसेसला ब्रेक लागणार आहे. 

पीएमपीएमएलने मागील दोन वर्षांपासून आतापर्यंत एमएनजीएलचे तब्बल ४७.२२ कोटी रुपयांचे बील थकवले आहे.  वेळोवेळी पत्रव्यवहार केल्यानंतरही पीएमपीएमएलने याची दखल न घेतल्यामुळे अखेर हा निर्णय घ्यावा लागला, अशी माहिती महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे वाणिज्यिक संचालक संतोष सोनटके यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

PMPMLचा नवा उपक्रम, ११ मार्गांवर शटल बससेवा

संतोष सोनटके म्हणाले, एमएनजीएलतर्फे शासनाच्या सर्व स्तरांवर पत्रव्यवहार करण्यात आला. प्रत्यक्ष भेटून याबाबत पाठपुरावा देखील करण्यात आला.मात्र, त्याबाबत कोणताही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत मिळणारे अनुदानाच्या थकबाकीचे कारण सांगण्यात आले. परिणामी थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अखेर पीएमपीएमएलला सीएनजीचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. थकबाकी मिळाल्याशिवाय हा पुरवठा सुरु करण्यात येणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हिंदुस्तान टाइम्सकडून 'एज्युसाइट्स' कॉनक्लेव्हचे आयोजन