पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्याच्या महापौरपदी भाजपचे मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे

पुण्याच्या महापौरपदी भाजपचे मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे

पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे नगरसेवक मुरलीधर मोहोळ आणि उपमहापौरपदी नगरसेविका सरस्वती शेंडगे यांची बहुमताने निवड झाली आहे. मनसेच्या दोन्ही नगरसेवकांनी तटस्थ भूमिका स्वीकारली. एमआयएमच्या नगरसेविका मतदानावेळी अनुपस्थित राहिल्या. 

यंदात पुणे महानगरपालिकेतील महापौरपद खुल्या सर्व साधारण गटासाठी सोडत निघाली. खुल्या वर्गासाठी भाजपकडून अनेक नगरसेवकांची नावे चर्चेत आली होती. मात्र त्या सर्वावर बाजी मारत महापौरपदासाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना तर उपमहापौरपदासाठी सरस्वती शेंडगे यांनी अर्ज दाखल केला होता. आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रकाश कदम आणि काँग्रेसच्या चांदबी नदाफ यांनी अर्ज दाखल केला. 

पवारांनी राजकारणातील चाणक्यावर केली मात, NCPचा भाजपला टोला

त्यानुसार महापालिकेच्या मुख्य सभागृहात निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी आघाडीच्या बाजूने मतदान केले. तर, मनसेच्या दोन्ही नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली. एमआयएमच्या नगरसेविका यांच्यासह ५ नगरसेवक मतदानावेळी अनुपस्थित राहिले. यानंतर महापौरपदासाठी मुरलीधर मोहोळ ९७, महाआघाडीचे महापौरपदाचे उमेदवार प्रकाश कदम यांना ५९. तर उपमहापौरपदाच्या भाजपच्या उमेदवार सरस्वती शेंडगे यांना ९७ आणि आघाडीच्या चांदबी नदाफ ५९ मते मिळाली. यावेळी मावळत्या महापौर मुक्ता टिळक आणि उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांचा सत्कार केला.

सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षांचा पाठिंबा: जयंत पाटील

पुणे महापालिकेतील पक्षीय बलाबल
भाजप- ९९
राष्ट्रवादी काँग्रेस- ४२
काँग्रेस- ९+१= १०
शिवसेना- १०
मनसे- २
एमआयएम- १

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:pune municipality corporation bjps murlidhar mohol elected as a mayor and saraswati shendge as deputy mayor