पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

यंदाच्या मान्सूनमध्ये पुणे-मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत होण्याचा विक्रम

पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.

मान्सूनमध्ये पश्चिम महाराष्ट्रात पावसाने नव्या विक्रमाचा आकडा गाठला. दरम्यान पावसामुळे वाहतूक कोंडीमध्येही अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे. पुणे-मुंबई रेल्वे मार्ग अनेकवेळा ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. या मार्गावर दरड कोसळल्याच्या  जवळपास ७ घटनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. हा देखील यंदाच्या मान्सूनमधील एक विक्रमच आहे. 

सांगलीत एसटी बस पलटी होऊन ३८ विद्यार्थी जखमी

लोणावळा आणि कात्रज दरम्यानच्या घाट प्रवण क्षेत्रात मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी दुपट्टीने दरड कोसळल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर तब्बल तीनवेळा मेगा ब्लॉकसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. तुफान पावसामुळे दरड कोसळल्याच्या घटनांमुळे मागील तीन महिन्यात अनेकदा रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याचे पाहायाला मिळाले. यामुळे पुणे-मुंबई मार्गावरुन नियमित प्रवास करणारे विद्यार्थी, नोकरदार वर्ग आणि पर्यटकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.  

राष्ट्रवादी काँग्रेसकडून बीडमधील ५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

पुणे रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या मान्सूनमध्ये अनेकदा पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वे सेवा रद्द करावी लागले. ऑगस्टपासून १४ दिवस रेल्वे वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प होती. छोट्या-मोठ्या दरड कोसळ्याच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने त्वरित मार्ग मोकळा केल्याची मनोज झवर यांनी यावेळी दिली. जुलैच्या पहिल्या आठवड्यांपासून ७ सप्टेंबरपर्यंत पुणे- मुंबई मार्गावर धावणारी डेक्कन एक्स्पेस, प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, सह्याद्री एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्स्प्रेस यासारख्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्याची वेळ आली होती.  ४ सप्टेंबर आणि ५ सप्टेंबर रोजी अनेक प्रमुख गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.    

 

कोंढवा भिंत दुर्घटना; तिघांविरोधात दोषारोपपत्र सादर

या समस्यांवरील उपाय म्हणून मध्य रेल्वेकडून मार्गावरील संवेदनशील ठिकाणांवर १२ किमीच्या अंतरावर ४८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पुढील वर्षांपर्यंत या मार्गावर आणखी २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची माहितीही रेल्वे अधिकाऱ्याने दिली.