पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणे-मुंबई महामार्ग आज दुपारी दोन तासांसाठी बंद राहणार!

 पुणे-मुंबई महामार्ग उद्या दोन तास बंद राहणार

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग गुरुवारी दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. महामार्ग पोलिस विभागाने यासंदर्भातील सूचना जारी केली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने ओव्हरहेड गॅन्ट्री टाकण्याच्या कामानिमित्त गुरुवारी  दुपारी १२ ते दुपारी २ वाजेपर्यंत मुंबईकडे जाणारा द्रुतगती मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.

या मार्गावरील वाहतूक तब्बल दोन तासांसाठी पूर्णपणे बंद असेल. या दरम्यान मुंबईकडे जाणारी मालवाहतूक आणि इतर अवजड वाहने द्रुतगती महामार्गावरील 85/500 किमी येथे थांबवली जातील. तर हलक्या आणि इतर प्रवाशी वाहनांना मुंबईकडे जाण्यासाठी NH-4 येथील मुंबई-पुणे महामार्गावर असलेल्या किवळे ब्रिजवरून वळवण्यात येणार आहेत. गुरुवारच्या दिवशी दोन तासांचा विलंब सहन करून वाहन चालक आणि प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे विभागाचे पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी केले आहे.