पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डेक्कन क्वीनचा चेहरा-मोहरा बदलणार!

डेक्कन क्वीन

पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर डेक्कन क्वीनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खास अशी बातमी आहे. नव्या वर्षांत डेक्कन क्वीनचा नवा लूक पाहायला पाहायला मिळणार आहे. पुण्यातील विभागीय रेल्वे व्यवस्थापक एसके जैन यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

'आयुष्यात मला पराभव माहीत नाही, राजू शेट्टींनी विचार करुन बोलावं'

डेक्कन क्वीनमध्ये सध्याच्या घडीला असलेल्या कोच हे वेगवान प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या एलएचबी (Linke Hofmann Busch) प्रमाणे बसवण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव मध्य रेल्वेने मंजूर केला असून लवकरच प्रसिद्ध डेक्कन क्वीनचा नव्या रुपात धावताना दिसेल, असे जैन यांनी सांगितले. 

पुणे-मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत होण्याचा नवा विक्रम

रेल्वे डब्यांच्या नियोजित बदलांमध्ये २० डब्यांच्या रेल्वेत खानपानासाठी असलेल्या प्रसिद्ध 'डायिनग कार'च्या व्यवस्था असेल. याशिवाय शहराचा वारसा जपण्याच्या उद्देशाने ऐतिहासिक छायाचित्रे देखील रेखाटल्याचे पाहायला मिळणार आहे. पुणे ते मुंबई मार्गावर विना थांबा धावणाऱ्या डेक्कन क्वीनने दैनंदिनी जवळपास १ हजार प्रवासी प्रवास करतात.  ब्रिटीशांनी १९३० साली सुरू केलेली डेक्कन क्वीनही डायनिंग कार आणि स्पेशल मेनूची व्यवस्था असलेली एकमेव नियमित धावणारी पँसेंजर आहे.