पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक कसब्यातून विजयी

विजयानंतर मुक्ता टिळक यांची प्रतिक्रिया (फोटो - राहुल राऊत)

भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आणि पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी विजय संपादन केला आहे. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे यांचा २७ हजार मतांनी पराभव केला. टिळक कुटुंबातील वारसदार असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने या मतदारसंघातून मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली होती. गेल्या २५ वर्षांपासून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघातून पुण्याचे खासदार गिरीष बापट हे सलग पाचवेळा निवडून आले होते. १९९५ पासून ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. पण मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकीटावर पुण्यातून विजय संपादन केला होता.

विधानसभेची निवडणूक एकतर्फी न होण्याची प्रमुख कारणे

गिरीष बापट लोकसभेत निवडून गेल्यामुळे कसब्यातून भाजप कोणाला उमेदवारी देणार याबद्दल खूप उत्सुकता आणि तीव्र स्पर्धा होती. पण लोकमान्य टिळकांच्या वारसदार म्हणून भाजपने या मतदारसंघातून मुक्ता टिळक यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यांच्याविरोधात काँग्रेसने अरविंद शिंदे यांना उमेदवारी दिली. अरविंद शिंदे यांनी प्रचारात शेवटच्या क्षणापर्यंत मुक्ता टिळक यांना जोरदार लढत दिली होती.

आकडे इतकेही वाईट नाहीत - संजय राऊत

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजपला मानणारा पारंपरिक मतदार मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा फायदा मुक्ता टिळक यांना या निवडणुकीत झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेचे विशाल धनवडे यांनी मतदारसंघातून बंडखोरी केली होती. पण त्याचा फारसा परिणाम झालेला नसल्याचे पाहायला मिळाले.