पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आर्थिक कारणावरून स्वतःच्या बहिणीचा खून, कारही जाळली

संग्रहित छायाचित्र

आर्थिक वादातून स्वतःच्या बहिणीचाच जाळून खून केल्याच्या आरोपातून पुणे पोलिसांनी जॉन बोराडे (वय ४०) याला अटक केली. बहिणीच्या डोक्यावर वार करून नंतर तिला कारमध्ये बसवून ती जाळून त्याने बहिणीचा खून केला. संगीता हिवळे (वय ४४) असे त्याच्या बहिणीचे नाव आहे. ९ ऑक्टोबर २०१८ रोजी ही घटना घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणीमध्ये राहणाऱ्या हिवळे यांचे जॉनशी आर्थिक कारणांवरून वाद होते. याच वादामध्ये एके दिवशी जॉनने हिवळे यांच्या डोक्याला तीव्र इजा केली होती. त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हिवळे यांना रुग्णालयात घेऊन गेले पाहिजे, म्हणून त्याने स्वतःची आई आणि हिवळे यांचा मुलगा सायमन यांना सोबत घेऊन चारचाकी गाडीने देहूरोड बाह्यवळण मार्गावरून रुग्णालयाच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली. 

निर्मनुष्य जागी गेल्यावर त्याने गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगत आई आणि सायमनला गाडीतून बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर त्याने गाडीला आग लावली, असे पोलिस तपासात दिसून आले.

बाह्यवळण मार्गावर सयाजी हॉटेलसमोर ही घटना घडली. जॉन बोराडे याला १७ एप्रिलपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे, सहायक पोलिस निरीक्षक उद्धव खाडे यांनी सांगितले. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.