पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सेकंड हँड कार घेणे पडले महागात, पुण्यात एकाची सव्वा लाखाची फसवणूक

पुण्यातील सायबर गुन्हेगारी

इंटरनेटच्या माध्यमातून सेकंड हँड कार विकत घेणे पुण्यातील एका नागरिकाला भलतेच महागात पडले आहे. या व्यक्तीची एक लाख २८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. कल्याणीनगरमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीचे नाव तेजिंदरसिंग कवलजीतसिंग अरोरा असे आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लालूंच्या घरी 'हाय व्होल्टेज ड्रामा', सुनेचा राबडीदेवींवर छळाचा आरोप

येरवडा पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांगल्या अवस्थेत असलेली सेकंड हँड मारुती स्वीफ्ट कार विकायची असल्याची एक जाहिरात पीडित व्यक्तीने इंटरनेटवर बघितली होती. त्यानंतर त्याने वेगवेगळ्या व्यवहारातून संबंधित रक्कम आरोपीच्या खात्यावर हस्तांतर केली. पण काही दिवसानंतरही गाडी न आल्यामुळे त्याला संशय आला. यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे पीडित व्यक्तीच्या लक्षात आले. इसाक पटेल असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. 

सीबीआय म्हणजे देव नाही, सुप्रीम कोर्टाने खडसावले

तेजिंदरसिंग अरोरा आणि इसाक पटेल हे केवळ ईमेलच्या माध्यमातूनच एकमेकांच्या संपर्कात होते. ते दोघे कधीही परस्परांना प्रत्यक्ष भेटले नव्हते. ७ मे ते ११ सप्टेंबर या काळात पैशांचे व्यवहार झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर कवलजिंतसिंग अरोरा यांनी सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण येरवडा पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आले.