पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोंढवा दुर्घटना; दोन्ही बिल्डर बंधूंना न्यायालयीन कोठडी

कोंढवा भागात भिंत कोसळलेल्या ठिकाणी सुरू असलेले मदतकार्य

पुण्यातील कोंढवा परिसरातील अॅल्कॉन स्टायलस इमारत दुर्घटनाप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या विवेक सुनील अग्रवाल व विपुल सुनील अग्रवाल यांना २० जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे. 

पुणे महानगरपालिकेने अॅल्कॉन स्टायलसच्या पडलेल्या भिंतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. आरोपींकडून लेबरकॅम्पबाबतची कागदपत्रे, दाखले, भोगवटापत्र जप्त करण्यात आली आहेत. बिल्डर पंकज व्होरा यांच्या कांचन ग्रुपचे रॉयल एक्झॉर्टिका साईटच्या कार्यालयामधून संबंधित जागेच्या दस्ताची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत, असा सरकारी वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला. युक्तिवादानंतर न्यायालयाने दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. 

दरम्यान, २९ जून रोजी इमारतीची संरक्षक भिंत कोसळून १५ मजूर ठार झाले होते. याप्रकरणी चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Pune kondhwa Wall Collapse Vipul Agrawal and Vivek Agrawal both have been sent to judicial custody