पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खडकवासला धरण १०० टक्के भरले, विसर्ग सुरू

खडकवासला धरण

पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी धरण प्रकल्पातील खडकवासला हे धरण सततच्या पावसामुळे १०० टक्के भरले आहे. या धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी १७१२ क्युसेक्स वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. जर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला, तर पाण्याचा विसर्ग आणखी वाढविला जाईल, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. मुठा नदीकाठच्या भागात राहणाऱ्या लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे.

... या क्षेत्रात २०२७ मध्ये भारत चीनला मागे टाकणार

पुण्याला खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. या चारही धरणांमध्ये मिळून सध्या ११.५३ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरणांच्या एकूण क्षमतेच्या ३९.५४ टक्के साठा सध्या धरणांत जमा झाला आहे. 

VIDEO : तीन वर्षांचा मुलगा मुंबईत नाल्यात पडला, शोध सुरू

पानशेत धरण ४४ टक्के, वरसगाव धरण ३२ टक्के, टेमघर धरण १७ टक्के भरले आहे. या चारही धरणांच्या क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. गेल्यावर्षी या धरणांमध्ये याच दिवशी १०.७२ टीएमसी एवढाच साठा शिल्लक होता. टेमघर धरणाच्या भिंतीचे काम सुरू असल्यामुळे या धरणामध्ये गेल्यावर्षी पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्यात आले नव्हते. यंदा हे काम पूर्ण झाल्याने या धरणातही पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्यात येणार आहे.